बीड (Beed) जिल्ह्यात बस आणि ट्रकचा (Bus And Truck Accident) भीषण अपघात झाला आहे. आज रविवारी झालेल्या या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील (Ambajogai Dist) सायगावजवळ बसची ट्रकला धडक बसली. ही टक्कर इतकी भीषण होती की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस लातूरहून औरंगाबादच्या दिशेने जात होती. दुसरीकडे ट्रक अंबाजोगाईहून लातूरच्या दिशेने येत होता. ट्रकमध्ये प्लास्टिकचे पाईप भरले होते. बस बर्दापूर फाट्याजवळ वळणावर येताच ट्रकची समोरासमोर धडक झाली.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
आतापर्यंत अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र हा अपघात किती भीषण होता, हे यावरून ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. ट्रकही ओव्हरलोड होता. त्यामुळे हा अपघात इतका भीषण झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत. (हे ही वाचा Mumbai Crime: मुंबईत 70 वर्षीय व्यक्तीचा 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, मुंबई न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे कैदेची सुनावली शिक्षा)
या अपघातात जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. दोन्ही गाड्यांची अवस्था पाहून त्यांचा वेग किती होता याची कल्पना येते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. जखमींना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे तेथील वाहतूक देखील विस्कळीत झाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. मृत्यु आणि जखमींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.