Close
Search

COVID19 Cases In Dharavi Today: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 5 नवे रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या 2 हजार 705 वर

Vasuki Indicus: गुजरातमध्ये शास्त्रज्ञांना सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; 50 फूट लांब होता 'वासुकी' साप
Close
Search

COVID19 Cases In Dharavi Today: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 5 नवे रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या 2 हजार 705 वर

महाराष्ट्र Ashwjeet Jagtap|

Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई (Mumbai) येथील धारावी (Dharavi) परिसरात कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत आज कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 705 वर पोहोचली आहे. सध्या धारावीत कोरोनाचे केवळ 90 ऍक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. ‘मिशन धारावी’च्या यशामुळे कोरोनाचे उच्चाटन होण्याच्या दिशेने धारावीची वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असे बिरुद मिरवणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले होते. मात्र, गेल्या काही दिवासांपासून या भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.

कोरोना प्रादर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. तसेच येथील अनेक परिसर सील करण्यात आले होते. मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. धारावीसह दादर आणि माहीम परिसरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. धारावी सारख्या दाट वस्ती असलेल्या परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्या मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबई महापालिका 320 जणांवर करणार Oxford Vaccine चाचणी

एएनआयचे ट्वीट-

एकेकाळी मुंबईतील कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे विभाग आता आटोक्यात आल्याचे चित्र आहे. वरळी, वांद्रे, भायखळा, नागपाडा, कुर्ला, माटुंगा, वडाळा, देवनार, मानखुर्द हे भाग आता रुग्णवाढीत सगळ्यात खालच्या क्रमांकावर आले आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change