प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

मुंबईत (Mumbai) आज 1 हजार 109 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 986 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 368 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 2,287 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 72,300 वर

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.