Navi Mumbai: 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 40 वर्षीय तरुणाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
Arrest | (Representative Image)

Navi Mumbai: नवी मुंबईतून (New Mumbai) अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. शेजारी राहणाऱ्या 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 40 वर्षीय व्यावसायिकाला एनआरआय कोस्टल पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. उलवे येथील सेक्टर 19 येथील रहिवासी असलेल्या आरोपीने शनिवारी सायंकाळी त्याचे कुटुंबीय घराबाहेर असताना आपल्या शेजारच्या सात वर्षांच्या मुलीला बुद्धिबळ खेळण्यासाठी घरी बोलावले होते. त्यानंतर आरोपीने तिला बेडरूममध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

अर्ध्या तासानंतर जेव्हा ती मुलगी घरी परतली तेव्हा ती घाबरलेली दिसत होती. ही बाब तिच्या आईच्या लक्षात आली आणि तिने तिला घडलेल्या प्रकाराबाबत सांगण्यास सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. (हेही वाचा -7 months old baby Kidnap: रेल्वे स्थानकावरून 7 महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण, घटना CCTV कैद)

दरम्यान, शेजारच्या व्यक्तीने गेल्या वर्षीही असेच कृत्य केल्याची माहिती मुलीने तिच्या आईला दिली. आरोपीने तिला याबद्दल कोणाला न सांगण्यास सांगितले होते. पीडितेला आरोपींनी विश्वास दिला होता की हा त्यांच्यातील एक गुप्त खेळ आहे, ज्याबद्दल इतर कोणालाही माहिती नसावी. (Gang-Rape And Murder Of Minor Girl: सामुहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या; चौघांना पोलिसांकडून अटक)

पीडितेच्या पालकांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली, असं एनआरआय कोस्टल पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी सांगितले. आरोपीला आयपीसी आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट (POCSO) च्या कलमांखाली अटक करण्यात आली आहे.