Photo Credit- X

Latur Accident: मित्राची पोलिस भरतीमध्ये निवड झाल्याच्या आनंदात जेवणाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या चार मित्रांचा अपघातात (Latur Accident)मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूरमध्येही घटना घडली. पार्टी करून घरी परतत असताना त्यांच्या कारची ट्रकला समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. चौघेही लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे होते. (MSRTC Job Recruitment: एसटी महामंडळात 208 जागांसाठी नोकर भरती, 13 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख; अर्ज कुठे अन् कसा कराल?)

अजीम शेख याची पुण्यातील दौंड येथे एसआरपीआय पदावर निवड झाली होती. त्याच्या भरतीचा आनंद साजरा करण्यासाठी ६ मित्र कारने बीडजवळच्या मांजरसुंबा येथे गेले होते. जेवणाची पार्टी झाल्यानंतर ते सर्वजण संभाजीनगर- लातूर राष्ट्रीय महामार्गावरून परत येत होते. त्यावेळी बीड जिल्ह्यातल्या वाघाळापाटी येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.

आपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. तर, भरती झालेला अजीम पाशामीया शेख (३०) व मुबारक सत्तार शेख (२८) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे कारेपूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.