नवी मुंबई: खारघर येथील पांडवकडा धबधब्यात 4 तरुणी वाहून गेल्या; शोधकार्य सुरु (Watch Video)
Drowning (Representational ImaGE/ Photo Credits: PTI)

नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर (Kharghar) येथे असलेल्या पांडवकडा धबधब्यात (Pandavkada Waterfall) चार तरुणी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चौघींपैकी एकीचा मृतदेह सापडला असून अद्याप तिघींचा शोध सुरु आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून शोधकार्य सुरु आहे. या चारही तरुणीही नेरुळ येथील एसआयईएस कॉलेजच्या विद्यार्थीनी आहेत. मृतदेह सापडलेली मुलगी ही चेंबूर येथील रहिवासी होती.

कॉलेजनंतर पावसात धबधब्यात मज्जा करण्यासाठी या तरुणी खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर गेल्या होत्या. मात्र तेथे ही दुर्घटना घडली. (मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

ANI Tweet:

पहा व्हिडिओ:

पांडवकडा धबधब्यात यापूर्वी देखील अनेकजणांना आपले प्राण गमवावे लागल्यामुळे तसंच तरुणाईकडून होणाऱ्या बेपर्वाईमुळे पोलिसांनी पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे. तरीही देखील आजच्या मुसळधार पावसात नियमांचे उल्लंघन करत या तरुणी धबधब्यावर गेल्या आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी किंवा धबधब्याकडे पर्यटकांची पाऊले वळू लागतात. मात्र पर्यटनासाठी गेले असताना तेथील नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पावसाचा आनंद लुटत असताना आपल्याकडून कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.