कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग महाराष्ट्रात वाढत असल्याच्या भीतीचा फायदा घेत जालना मध्ये एका हॅन्ड सॅनिटायझर (Hand Sanitisers) विकणार्या कंपनीने सुमारे 6 लाख रूपयांचा माल लपवून ठेवल्याच्या प्रकरणी 4 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही घटना जालना येथील असून पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांच्या मदतीने ही कारवाई शनिवार (21 मार्च) दिवशी करण्यात आली आहे. Coronavirus चा प्रार्दुभाव टाळण्यासाठी दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा ने स्विकारले #HandWashChallenge, Watch Video.
जालना पोलिसांच्या क्राईम ब्रांचला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी अन्न व औषध प्रशासनासोबत जाऊन कारवाई केली. दरम्यान हे हॅन्ड सॅनिटायझरचं दुकान जुना मोंधा रोड येथे करण्यात आली आहे. पोलिसांनि धाड टाकल्यानंतर दुकान मालकाकडे बिलांची मागणी करण्यात आली. मात्र इतक्या मालाच्या खरेदीचं बिल नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस कारवाई करताना चार जणांच्या विरूद्ध कलम 420 म्हणजेच फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांना स्वच्छता पाळण्याचं आवाहन करताना हात हॅन्ड सॅनिटायझरने किंवा साबणाने किमान 20 सेकंद धुवा असा सल्ला दिला जात आहे.
4 people arrested in Maharashtra's Jalna city for allegedly hoarding hand sanitisers worth over Rs 6 lakh: Police.
— Press Trust of India (@PTI_News) March 21, 2020
देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 258 च्या पार पोहचला असून महाराष्ट्रात सर्वाधिक 63 रूग्ण आढळले आहेत. मुंबई, पुणे शहरात हे नवे रूग्ण आढळल्याने आता नागरिकांना खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे.