4 Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोली मध्ये 4 नक्षलवादी पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील रेपनपल्लीच्या जंगलामध्ये काल (18 मार्च) रात्री पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना (Naxalites) कंठस्नान घालण्यामध्ये यश आलं आहे. अहेरी तालुक्यामध्ये येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलामध्ये ही चकमक झाल्याची माहिती गडचिरोलीच्या एसपींनी दिली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचे सर्च ॲापरेशन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या C-60 पथकाने केलेली ही एक महत्त्वाची आणि मोठी कारवाई आहे.

विशेष बाब म्हणजे ठार केलेल्या चार नक्षवाद्यांवर महाराष्ट्र राज्य सरकारने 36 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. चकमकीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त केली आहेत. त्यामध्ये Ak-47, एक कारबाईन, 2 कट्टे नक्षली वस्तू यांचा समावेश आहे. नक्की वाचा:  Maoist Link Case: नक्षलवाद प्रकरणी जी एन साईबाबा सह अन्य 4 आरोपींची जन्मठेप रद्द; नागपूर खंडपीठाचा निकाल.

पहा ट्वीट

तेलंगणा राज्य कमिटीच्या या नक्षलवाद्यांनी प्रंहिता नदीमार्गे गडचिरोली मध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर C-60 आणि CRPF च्या रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स टीमने शोधमोहीम सुरु केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) यातिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहिम राबवण्यात आली. पोलीस मदत केंद्र रेपनपल्लीच्या 5 किमी अंतरावर कोलामार्का जंगलामध्ये आज पहाटे शोध घेत असताना 4 नक्षलवाद्यांनी C60 दलांच्या एका पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. C60 पथकांने देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. डीव्हीसीएम वर्गेश, डिव्हीसीएम मगटू, कुरसंग राजू, कुडिमेट्टा व्यंकटेश  अशी मृतांंची नावं आहेत.