Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Nagpur Violence: नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या दंगलीत जखमी झालेले 38 वर्षीय इरफान अन्सारी यांचे शनिवारी निधन झाले. हिंसाचाराच्या दिवशी इरफान रेल्वे स्थानकाजवळ गंभीर अवस्थेत आढळले होते. इरफान अन्सारी नागपूर रेल्वे स्थानकावरून इटारसीला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी गेले होते. त्यांना जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताबडतोब इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे ते गेल्या 6 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी इरफान अन्सारी यांनी मृत्यूशी झूंज अपयशी ठरली.

प्राप्त माहितीनुसार, इरफान अन्सारी 17 मार्च रोजी, दुपारी 1 वाजता नागपूर रेल्वे स्टेशनवरून इटारसीला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी निघाले. सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ते घराबाहेर पडले. बडे नवाज नगर येथील रहिवासी इरफान अन्सारी वेल्डर म्हणून काम करत होते. (हेही वाचा -Nagpur Violence: नागपूर हिंसाचार प्रकरणातील 17 आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी)

दरम्यान, इरफानचा भाऊ इम्रानने त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले होते की, इरफानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने इरफानला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु सर्व प्रयत्न करूनही डॉक्टरांना त्याचा जीव वाचवण्यात अपयश आले. (हेही वाचा - Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसक दंगल; जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमुळे वातावरण तापले, CM Devendra Fadnavis यांचे शांततेचे आवाहन (Video))

नागपूरात दंगल का झाली?

17 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 वाजता मध्य नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार झाला होता, ज्यामध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. हिंसाचारात 3 डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह 33 पोलिस जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पवित्र श्लोक असलेली पत्रक जाळण्यात आल्याची अफवा परिसरात पसरली. ज्यामुळे नागपूरात दंगल पेटली.

नागपूर हिंसाचारात आतापर्यंत एकूण 105 जणांना अटक करण्यात आली आहे. नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारातील आरोपींना शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांनी 18 विशेष पथके तयार केली आहेत. गुरुवारी याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत 69 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी 200 आरोपींची ओळख पटवली आहे आणि सीसीटीव्ही फुटेजवरून इतर संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.