
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची (Coronavirus) परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड-19 (COVID-19) रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) काल (30 जुलै) दिवसभरात 11 हजार 147 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 266 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 11 हजार 798 इतका झाला आहे. यातील 2 लाख 48 हजार 615 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तसेच सध्या 1 लाख 48 हजार 150 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत (Mumbai) असून शासनाच्या अथक प्रयत्नामुळे तसेच लोकांनी नियमांचे पालन केल्यामुळे ही परिस्थिती हळूहळू आटोक्यात येत आहे. मुंबईत शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,13,187 वर पोहोचली आहे. काल मुंबईमध्ये 1058 कोरोना बाधित रुग्ण बरे आहेत, यासह शहरामध्ये आतापर्यंत एकूण 86,385 रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी


यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 8860 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर 60.37 टक्के आहे. तर कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण 3.58 टक्के इतका आहे. सध्या 9 लाखापेक्षा जास्त जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अपडेट्सनुसार, देशात 52 हजार 123 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 775 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 लाख 83 हजार 792 इतकी झाली आहे. यातील 34 हजार 968 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 5 लाख 28 हजार 242 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.