Coronavirus Update: मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली सह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणून घ्या
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) कालच्या दिवसभरात तब्बल 7 हजार 924 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 83 हजार 723 वर पोहचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 592 रुग्ण ऍक्टिव्ह (COVID19 Active Cases) आहेत. यामध्ये दिलासादायक असे की, आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या माहितीनुसार, काल राज्यात एकूण 8706 रुग्ण कोरोनमुक्त (Coronavirus Recovered Cases) झाले यानुसार आतापर्यंत 2 लाख 21 हजार 944 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आपण कोरोना रुग्णवाढीचा, मृत्यूंचा आणि बरे होणाऱ्यांचा आकडा जर सरसरीत पाहिला तर आता महाराष्ट्र कोरोनावर मात करण्याच्या वाटेवर आहे असा दिलासा दिसून येतोय. सद्य घडीला महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्यात व सर्व छोट्या मोठ्या महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे आता आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (28 जुलै)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1,10,182 6132
2 ठाणे 12,603 267
3 ठाणे मनपा 19,460 675
4 नवी मुंबई मनपा 15,570 409
5 कल्याण डोंबिवली मनपा 21,401 388
6 उल्हासनगर मनपा 6796 134
7 भिवंडी निजामपूर मनपा 3715 254
8 मीरा भाईंदर 8245 259
9 पालघर 3151 39
10 वसई विरार मनपा 11,271 268
11 रायगड 8403 175
12 पनवेल मनपा 6579 154
ठाणे मंडळ एकूण 2,27,376  9154
1 नाशिक 3194 107
2 नाशिक मनपा 8350 236
3 मालेगाव मनपा 1338 88
4 अहमदनगर 1805 36
5 अहमदनगर मनपा 1623 14
6 धुळे 1266 50
7 धुळे मनपा 1156 43
8 जळगाव 7212 388
9 जळगाव मनपा 2291 94
10 नंदुरबार 516 26
नाशिक मंडळ एकूण 28,751 1082
1 पुणे 8057 227
2 पुणे मनपा 52,395 1295
3 पिंप्री-चिंचवड मनपा 17,678 316
4 सोलापूर 3255 79
5 सोलापूर मनपा 4819 367
6 सातारा 3222 113
पुणे मंडळ एकुण 89,426 2397
1 कोल्हापूर 3290 61
2 कोल्हापूर मनपा 601 21
3 सांगली 846 28
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 726 22
5 सिंधुदुर्ग 341 6
6 रत्नागिरी 1549 56
कोल्हापूर मंडळ एकुण 7353 194
1 औरंगाबाद 3063 51
2 औरंगाबाद मनप 9059 398
3 जालना 1791 68
4 हिंगोली 522 11
5 परभणी 277 13
6 परभणी मनपा 183 5
औरंगाबाद मंडळ एकूण 14,895 546
1 लातूर 951 48
2 लातूर मनपा 691 27
3 उस्मानाबाद 693 35
4 बीड 581 17
5 नांदेड 630 21
6 नांदेड मनपा 732 33
लातूर मंडळ एकूण 4278 181
1 अकोला 720 35
2 अकोला मनपा 1670 74
3 अमरावती 280 14
4 अमवरावती मनपा 1392 39
5 यवतमाळ 786 26
6 बुलढाणा 1041 29
7 वाशीम 530 10
अकोला मंडळ एकूण 6419 227
1 नागपूर 915 4
2 नागपूर मनपा 2789 41
3 वर्धा 135 4
4 भंडारा 210 2
5 गोंदिया 242 3
6 चंद्रपूर 249 0
7 चंद्रपूर मनपा 94 0
8 गडचिरोली 238 1
नागपूर मंडळ एकूण 4880 55
1 इतर राज्य 345 47
एकूण 3,83,723 13,883 

दरम्यान, महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे, मात्र त्यानंतरची स्थिती कशी असेल याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. यावेळी सरकार नव्याने कोणत्या सेवा सुरु करणार, मुंबईच्या लोकल मधून फिरण्यासाठी सामान्य नागरिकांना सुद्धा परवानगी मिळणार का असे अनेक प्रश्न 31 जुलै च्या आधीच सुटतील असे अंदाज आहेत.