Mantralay (Photo Credits : Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाने (Coronavirus) डोके वर काढले आहे. राज्यात कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. यामुळे राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच महाराष्ट्र विधानसभेतून (Maharashtra Assembly) सर्वांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेतून 6 मार्च आणि 7 मार्च रोजी प्राप्त झालेल्या 2 हजार 746 नमुन्यांपैकी 36 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

महाराष्ट्रात सलग दोन दिवस 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात रविवारी (7 मार्च) 11 हजार 141 कोरोनाबाधित आढळून आले होते. तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 22 लाख 19 हजार 727 वर पोहचली आहे. तर, मृतांच्या संख्येने 52 हजार 478 आकडा गाठला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Budget 2021: राज्याचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार, कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता?

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात सांगली, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद आणि सातारा येथे मृत्यूचे प्रमाण तीन टक्क्यांहून अधिक आहे. राज्यात रविवारी 91 हजार 235 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. ज्यामुळे कोरोना चाचणीची एकूण संख्या 1 कोटी 68 लाख 67 हजार 286 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.