Mumbai: BMC शाळा आवारात 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि बिडीचे चटके, 24 वर्षीय तरुणास 20 वर्षांचा तुरुंगवास
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai: फेब्रुवारी 2019 मध्ये बीएमसी शाळेच्या (BMC School) आवारात चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करून तिला बिडीने चटके दिल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने 24 वर्षीय व्यक्तीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीनुसार, पोलिस तक्रारीनुसार पीडितेच्या आईने 12 फेब्रुवारी 2019 रोजी तक्रार दाखल केली होती. तिने आरोप केला आहे की, 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी तिची मुलगी बोरिवलीतील शाळेच्या आवारात खेळत असताना ही घटना घडली. काही वेळाने पीडित मुलगी घरी आली तिने आईला आरोपीने तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचे सांगितले.

संतप्त झालेल्या महिलेने आरोपीचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. राकेश नावाच्या आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्या बोटाला बिडीने चटके दिले. कुटुंबीयांनी आरोपींशी संपर्क साधला असता, त्याने पोलिसांना या प्रकरणाची तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सुरुवातीला ते घाबरले होते, पण आरोपी त्यांच्या परिसरात फिरत असल्याने पीडितेच्या आईने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. शाळेच्या चौकीदारानेच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. (हेही वाचा -Pune Drug Girl Video: पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? नशेत बेधुंद असलेल्या तरुणींचा हादरवणारा Video व्हायरल)

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, मुलीने न्यायालयात आरोपीला ओळखले आणि चौकीदारावरील आरोप फेटाळले. पीडितेची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली, ती साक्ष देताना आठ वर्षांची होती. पीडितेला आरोपीविरुद्ध खोटे साक्ष देण्याचे कोणतेही कारण नाही. तिच्या साक्षीला पालकांनी पाठिंबा दिला आहे. (हेही वाचा - Pune Shocker News: पुण्यातील धक्कादायक घटना, पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या)

दरम्यान, बुधवारी चेंबूरमधील आरसीएफ पोलिसांनी एका 57 वर्षीय व्यक्तीला त्याच्या इमारतीत राहणाऱ्या 12 आणि 13 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीडितांपैकी एकाने तिच्या पालकांसमोर खुलासा केल्यानंतर मंगळवारी हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून दोन्ही मुलींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.