Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,389 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,78,275 वर
Medical workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 2,389 रुग्णांची नोंद झाली आहे, यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,78,275 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 1,173 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 1,36,739 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 32,849 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये कोरोनाच्या 43 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 8,320 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने (BMC) याबाबत माहिती दिली.

मुंबईमध्ये आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 31 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 32 रुग्ण पुरुष व 11 रुग्ण महिला होत्या.2 रुग्णांचे वय 40 वर्षा खाली होते. 28 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 13 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर  77 टक्के झाला आहे. 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.26 टक्के आहे. 16 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 9,64,609 इतक्या झाल्या आहेत. सध्या मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 55 दिवस झाला आहे. (हेही वाचा: मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 15 रुग्ण आढळल्याने आकडा 2975 वर पोहचला)

पीटीआय ट्वीट -

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 16 सप्टेंबर नुसार मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 590 इतकी आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 9,365 इतक्या आहेत. दरम्यान, राज्यात आज 24,619 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 19,522 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 8,12,354 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3,01,752 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.90% झाले आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 11,45,840 वर पोहोचली आहे. आज राज्यामध्ये 398 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 31,351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.