महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळले आहेत. राज्यात आज 2 हजार 347 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 53 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 हजार 688 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 90 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 2 हजार 872 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 34 हजार 109 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- मुंबईमध्ये कोरोनाचा हाहाकार! आज दिवसभरात 1571 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 38 जणांचा मृत्यू; शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 19 हजार 967 वर पोहोचली
एएनआयचे ट्वीट-
2,347 new positive #COVID19 cases & 63 deaths reported today in the state. Total 33,053 positive cases have been detected in the state til date. 600 patients discharged today, total 7688 patients have been discharged till now: Maharashtra Health Department pic.twitter.com/JnuKERvBHs
— ANI (@ANI) May 17, 2020
देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या जात आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.