Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 48 तासात 222 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 5,935 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 74 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 4,715 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र पोलिस दलाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर्स, पोलिस कर्मचारी, वैद्यकिय कर्मचारी, पत्रकार आदी आपल्या जीवाची बाजी लावत आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. परंतु, यातील अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात हजारो पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्रामध्ये 6,875 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 219 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्रामधील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,30,599 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 1,27,259 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 93,652 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.