
Bhiwandi Gang Rape Case: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. येथे सहा जणांनी पीडितेला ओलीस ठेवले आणि नंतर तिच्यावर दोनदा सामूहिक बलात्कार केला. यानंतर, तिला गंभीर अवस्थेत सोडून ते घटनास्थळावरून पळून गेले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबासह ठाणे येथील भिवंडी येथे राहते. काल रात्री तिला तिच्या भावाचा फोन आला. तिच्या भावाने सांगितले की, तो अडचणीत आहे. त्याला वाचवण्यासाठी तरुणी तिच्या भावाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली तेव्हा तिथे सहा जण उपस्थित होते. त्यांनी प्रथम पीडिता, तिचा भाऊ आणि तिला घेऊन येणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. यानंतर पीडितेला ओलीस ठेवण्यात आले. (हेही वाचा -Muzaffarnagar Gang Rape: तरुण मेहुणी पाहून विकृती संचारली, सामूहिक बलात्कार करुन हत्या केली; मुझफ्फरनगर येथील खळबळजनक घटना)
शांती नगर पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी पीडितेला संपूर्ण रात्र आपल्या वासनेचा बळी बनवले. या काळात, त्यांनी नागावमधील एका शाळेजवळ आणि फातिमानगरमधील एका पिकअप व्हॅनमध्ये तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडिता कशी तरी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली. त्यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणीचे कुटुंबिय तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. या प्रकरणात, प्रथम भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात शून्य एफआयआर नोंदवण्यात आला. (हेही वाचा - Pune Rape Case: बोपदेव घाटात फिरण्यासाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार, तीन आरोपींवर गुन्हा दाखल)
यानंतर हे प्रकरण शांती नगर पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोधही सुरू केला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यासोबतच पीडितेचा आऊ आणि ऑटो चालकाचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.