Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईतील (Mumbai) भायखळा (Byculla) येथील सेंट जोसेफ अनाथालय (St. Joseph's Orphanage) आणि शाळेत 22 लोकांना कोविड संसर्गाची (Corona Virus) लागण झाली आहे. येथे नोंदवलेल्या बहुतेक प्रकरणांमध्ये मुली आणि किशोरवयीन मुलींचा समावेश आहे. यापैकी 12 वर्षांखालील चार मुलींना मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलच्या (Nair Hospital) बालरोग विभागात दाखल करण्यात आले आहे. तर इतर 18 जणांना भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रुदास कोविड केअर सेंटरमध्ये (Richardson and Crudas Covid Care Center) पाठवण्यात आले आहे. हे सेंट जोसेफ अनाथालय आणि शाळा भायखळ्याच्या आग्रीपाडा भागात आहे. हे अनाथाश्रम फक्त मुली आणि महिलांसाठी बांधण्यात आले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापैकी कोणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत आणि सर्वांची स्थिती सामान्य आहे.

बीएमसीने सांगितले की, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या चार मुलीं व्यतिरिक्त, यापैकी 12 मुली 12 ते 18 वयोगटातील आहेत. तर सहा प्रौढांचाही त्यात समावेश आहे. त्यापैकी एक 71 वर्षीय महिला अनाथाश्रमाच्या स्वयंपाकघरात काम करते. सोमवारी, अनाथाश्रमातील दोन मुलींचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर येथे राहणाऱ्या सर्व मुली आणि कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. हेही वाचा MNS On CM Uddhav Thackeray: आपणास धनुष्य बाणाचा विसर पडल्याचे म्हणत मनसेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

भायखळा ई-वॉर्डचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त मनीष वाळुंजे म्हणाले, आम्ही येथे 24 ऑगस्ट रोजी एक चाचणी शिबिर ठेवले होते. अनाथाश्रमात राहणाऱ्या मुली आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 95 जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. 25 ऑगस्ट रोजी अहवाल आला. यात 22 जणांना कोविड संसर्गाची लागण झाली आहे. त्यानंतर आम्ही सावधगिरीचा उपाय म्हणून मुलींना नायर हॉस्पिटल आणि इतरांना भायखळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठवले आहे.

इथल्या इतर लोकांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन, पाच दिवसांनंतर पुन्हा एकदा सर्वांची कोविड चाचणी अनाथाश्रमात केली जाईल. प्रोटोकॉल अंतर्गत, अनाथाश्रम सीलबंद करण्यात आले आहे. तसेच सॅनिटाईझ करण्यात आले आहे आणि इतर सर्व लोकांना येथे विलग ठेवण्यात आले आहे. या 22 लोकांमध्ये, डेल्टा किंवा डेल्टा प्लसची पुष्टी करण्यासाठी सर्वांचे नमुने जीनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

भायखळा ई-वॉर्डचे आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुजर म्हणाले, सर्व 22 लोकांचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेंसींगसाठी पाठवण्यात आले आहेत. आम्ही या चाचण्यांच्या परिणामांची वाट पाहत आहोत. या सर्वांचे आरोग्य आम्ही सतत निरीक्षण करत आहोत. जर या सर्वांची प्रकृती एकत्र दिवस सामान्य राहिली तर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.