लग्नसराईचा मोसम आणि त्यात अक्षय्य तृतीयेची भर यामुळे सोन्या-चांदीच्या खरेदीला चांगलाच वेग आला आहे. मात्र सोन्याचे दर नेहमीच वर-खाली होत असतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी आजचा (2 मे) सोन्याचा भाव काय आहे, जाणून घेऊया. (Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेला का कराल सोन्याची खरेदी? जाणून घ्या यामागील ५ मुख्य कारणं)
आजचा सोन्याचा भाव:
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 तोळ्यामागे 30,700 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 31,850 इतका आहे. पुणे, नागपूर, नाशिक या ठिकाणीही सोन्याचा हाच दर सुरु आहे. 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम.
1 मे च्या तुलनेत आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. मात्र टॅक्स आणि दागिन्यांवरील घडणावळ यामुळे दरात तफावत जाणवू शकते.
(सोन्याचे दर हे Goodreturns.in वेबसाईटच्या माहितीनुसार देण्यात आले आहेत.)