Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Juhu Resident Drowns In Dam: अलिबाग (Alibaug) मधील कमर्ले धरणात शनिवारी पिकनिकसाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. ग्रेसन जॅसिंटो असं या तरुणाचं नाव आहे. जुहू येथील रहिवासी असलेले जॅकिंटो हे कुटुंब आणि मित्रांसह धरणावर पिकनिकसाठी गेले होते. ही घटना आपापसातील पोहण्याच्या स्पर्धेदरम्यान घडली ज्यात त्यांनी धरणाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला. त्याचा मृतदेह 30 फूट पाण्याखाली चिखलात अडकला होता.

जॅसिंटोच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. जलतरण स्पर्धेदरम्यान जॅसिंटो थकला. त्यामुळे तो धरणाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. मदतीसाठी त्याची ओरड ऐकून काही गावकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा -Shirur Accident: अल्पवयीन मुलीने पिकअप खाली दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू, पोलिस पाटलाला अटक)

दरम्यान, स्थानिकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र कराडे, पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकासह समरिटन ग्रुपने तरुणाचा शोध सुरू केला. मात्र, सायंकाळी उशीर झाल्याने त्यांनी सोमवारी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास बचाव कार्याला सुरुवात झाली आणि रात्री 12.45 च्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. स्कूबा डायव्हिंग करताना बचाव पथकातील सदस्यांना त्याचा माग काढता आला नाही. शोधासाठी त्यांनी मॅन्युअल पद्धतींचा वापर केला.