हेडफोन्स'वर सत्संग सोहळा photo credit Twitter ( प्रातिनिधिक फोटो)

Guru Nanak Jayanti 2018 : भारतीय सण - उत्सवाचं सेलिब्रेशन हे गाणी, मिरवणूका याशिवाय अपूर्णच असतं. त्यामुळे अनेकदा ध्वनीप्रदूषण, त्याबद्दल असलेले नियम, कायदे धाब्यावर बसवून सण मोठा करण्याकडे अनेकांचा कल असतो. 23 नोव्हेंबरला देशभरात कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima) आणि गुरुनानक जयंतीचा (Guru Nanak Jayanti) उत्सव रंगणार आहे. शीख धर्मीय मोठ्या उत्साहाने दिवशी प्रकाश उत्सव साजरा करतात. गुरुनानकांचा उपदेश पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी सत्संगाच आयोजन केलं जातं. मात्र उल्हासनगरमध्ये कायदे आणि नियमाच्या चौकटीत राहूनच गुरुनानक जयंतीचा सोहळा रंगणार आहे.

उल्हासनगरमध्ये पहाटे 4-5 च्या सुमारास मैदानावर 20 हजार भाविकांच्या उपस्थिततीमध्ये सत्संग सोहळा रंगतो. मात्र सारे अगदी शांततेत ! वीस हजार लोकांची उपस्थिती तरी सारे शांततेत हे वाचून गोंधळल्यासारखे वाटले असेल पण हे खरं आहे. उल्हासनगरच्या गोल मैदानात नोव्हेंबर महिन्यात अमृत वेली परिवाराचा सत्संग रंगतो परंतु यामध्ये प्रत्येक भाविकाला खास हेडफोन दिलेला असतो. त्यामुळे सारे काही 'वन टू वन' असते. परिसरातील इतरांची सत्संगाच्या आवाजामुळे ना झोपमोड होत ना त्रास !  Guru Nanak Jayanti 2018 : भारतासह जगभरात 3 दिवस साजरा केला जातो खास गुरुपर्व उत्सव !

सत्संगामध्ये हेडफोन वापरण्याची पद्धत मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. शीख समुदायाचे संत भाईसाहब भजन आणि प्रवचन देत असतात. सोबत हा कार्यक्रम जवळपास 25 लाख अनुयायी आणि भाविक लाईव्ह पाहत असतात मात्र त्याचा परिसरातील इतर लोकांना ध्वनीप्रदूषणाच्या माध्यमातून मुळीच त्रास होत नाही. Happy Gurpurab 2018: जीवनातील साऱ्या दुःखांवर उपाय आहेत गुरुनानकांचे हे '९' बहुमूल्य उपदेश !

23 नोव्हेंबर पर्यत हा सत्संग सोहळा चालणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गुरू गोविंद सिंह यांचा जन्मसोहळा (Guru Nanak Jayanti) याठिकाणी होणार असून या सोहळ्याला जवळपास 1 लाख भाविक हजेरी लावतील, असं अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.