Pimpri Chinchwad Crime: सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई
arrest

पिंपरी चिंचवड शहरात महिलांशी गैरवर्तन करून त्यांच्या सोनसाखळी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखाने बेड्या ठोकल्या आहेत. बुद्धदेव विष्णू बिश्वास आणि मिटू मिहीर बिश्वास मुळ राहणार पश्चिम बंगाल अशा अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीचे नाव आहेत. या दोन्ही आरोपीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसाचा गुन्हे शाखा चार पोलीस पदकाने जबरी चोरीचे एकुण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत.

बुद्धदेव विष्णू बिश्वास आणि मिटू मिहीर बिश्वास हे दोन्ही अट्टल चोरटे पिंपरी चिंचवड शहरात राहून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलाशी गैर वर्तन करून त्यांचे सोन्याचे दागिने बळजबरी चोरी करत असे, अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली होती. हे दोन्ही आरोपी पिंपरी चिंचवड शहरात सारखं आपलं राहण्याच ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडण्याचा मोठा आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर होते. अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून, तसेच हिंजवडी परिसरात सापळा लावून या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.