Vidarbha Farmers News: राज्यातल्या बळीराजाला जीवन जगन कठीण झालं (Maharashtra Farmer Suicide)आहे. कधी दुष्काळ तर कधी पूरपरिस्थीतीमुळे शेतकऱअया हाता-तोंडाशी आलेला खास हा हिरावून जातो. पिक पिकवण्यासाठी बँकांमधून घेतलेलं कर्जाचं ओझं त्याला फेडता येत नाहीये. त्यामुळे राज्यातला शेतकरी आत्महत्येच टोकाच पाऊल उचलत आहे. मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडताना दिसत आहेत. त्या पाठोपाठ आता विदर्भातही शेतकरी आत्महत्येच्या(Vidarbha Farmers ) घटना वाढत आहेत.
विदर्भातील शेतकरी आत्महत्येबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अवघ्या ६० दिवसांत विधानसभा निवडणुकीदरम्यान 197 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान 197 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. पश्चिम विदर्भात चालू वर्षी 11 महिन्यात 985 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राजकीय नेते विधानसभा निवडणुकीत व्यस्त असताना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या 60 दिवसात विदर्भात 198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण -
- अमरावती 219
- अकोला 147
- यवतमाळ 317
- बुलडाणा 208
- वाशिम 94
- एकूण 985
राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशीला हमीभाव मिळत नाही. कर्जबाजारी, शासकीय योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक 317 शेतकरी आत्महत्यांच्या घटना यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची माहिती आहे.