High Tide In Mumbai Today: मुंंबई शहरात पश्चिम उपनगरांंमध्ये आज सकाळपासुन जोरदार पावसाला (Mumbai Rains) सुरुवात झाली आहे. अशातच आज सकाळी 11 वाजुन 39 मिनिटांनी मुंंबईच्या समुद्र किनार्यात 4.42 मीटर उंचीच्या लाटा (High Tide) उसळणार आहेत. समुद्र भरतीच्या वेळी किनारपट्टी लगतच्या भागात नागरिकांंनी जाउ नये अशा सुचना बीएमसी (BMC) तर्फे देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे काल रात्रीपासुन मुंंबई व उपनगरात पावसाचा जोर सुद्धा वाढला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार पुढील 48 तास मुंंबई मध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. याशिवाय पुढील 2 ते 3 तासात पुर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र, सातारा सह किनारपट्टीजवळील शहरांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 18 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये येत्या पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, मराठवाडा व विदर्भ येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः सोलापुर,सांगली, लातुर, उस्मानाबाद, जळगाव, सिंधुदुर्ग या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मुंंबई आणि ठाणे परिसरात आयसोलेटेड भागात मध्यम ते मुसळधार पाउस होईल असा अंंदाज आहे. त्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ANI ट्विट
A high tide of 4.42 meters expected at 1139 hours in Mumbai today: India Meteorological Department (IMD)
— ANI (@ANI) August 18, 2020
दरम्यान, मुंबई, ठाणे आणि एनएम येथे गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी 70-100 मिमी पाऊस पडला. दहिसर, नेरूळ येथे 120 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑगस्ट च्या सुरुवातीपासुन राज्यात पाउस जोरदार स्वरुपात सुरु आहे. राज्यात 20 ते 22 ऑगस्टपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे