नागपूरमध्ये (Nagpur)17 महिन्यांच्या बाळाचा वॉकरमधून (Walker) पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रंजीत सारंग ठाकरे, असं मृत बाळाचे नाव आहे. 13 जानेवारीला रंजीत वॉकरवर खेळत होता. त्यानंतर तो वॉकवरून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली.
डोक्याला दुखापत झाल्याने रंजीतच्या कुटुंबियांनी त्याला ट्रामा सेंटरमध्ये दाखल केलं. परंतु, रंजीतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाकरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाळाच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा - धक्कादायक! नांदेडमध्ये सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर 4 शिक्षकांचा सामूहिक बलात्कार)
कुटुंबात लहान मुलं जन्माला आलं की, त्या घराचे वातावरण आनंदी होते. प्रत्येक घरात लहान मुलाची विशेष काळजी घेतली जाते. डिसेंबर 2019 मध्ये नाशिकच्या डीजीपी नगर येथे एक वर्षाच्या लहान बाळाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. हे बाळ घराच्या परिसरात खेळत असताना ते पाण्याच्या टाकीत पडले होते. घरात खेळताना अनेक छोट-मोठे अपघात होतात. आतापर्यंत या अपघातांमध्ये अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे.