COVID-19 Update In Maharashtra Police: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 159 जणांना बाधा
पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

COVID-19 Update In Maharashtra Police: सध्या देशावर कोरोना विषाणूचं मोठं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जलद गतीने होताना दिसत आहे. देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी कोरोना रुग्ण बरे होणारा दरही जास्त आहे. मात्र, कोरोनाने आतापर्यंत अनेक कोरोना योद्ध्यांना आपल्या विळख्यात ओढलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 159 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोना योद्धा म्हणून काम करताना आतापर्यंत राज्यातील 222 कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (हेही वाचा - Coronavirus Update: देशात 24 तासात 86,961 रुग्णांंसह एकुण कोरोनाबाधितांंचा आकडा 54 लाखावर, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांंचा आकडा सुद्धा 10 लाख पार)

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 21,311 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. मात्र, यातील 17,434 कर्मचाऱ्यांनी कोरोनाशी यशस्वीरित्या झुंज दिली. यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस विभागाने माहिती दिली आहे. राज्यात अनलॉक केल्यापासून कोरोना विषाणू अधिक प्रमाणात पसरत आहे. देशभरातील कोरोना रुग्णांनी 54 लाखांचा आकडा पार केला आहे.