शहरात कोरोनाचा (Coronavirus) धोका अधिक वेगाने वाढू लागला आहे. सलग आठदिवसांपासून कोरोना बाधीतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यातच अहमदनगरकरांच्या (Ahmednagar) चिंतेत आणखी भर पडल्याची दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सारीच्या (SARI) रोगाचे जाळे पसरत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर येथे आतापर्यंत 15 लोकांना सारीच्या रोगाची लागण झाली आहे. यामुळे अहमदनगर परिसरात भितीजनक वातावरण निर्माण आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोना आणि सारीच्या रोगाचे लक्षणे लगभग एकसारखीच असल्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. अहमदनगर येथील नेवासा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. परंतु, यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 28 वर पोहचली आहे. नेवासा शहरात राहणारा पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण सारी आजाराने त्रस्त होता. त्यातच त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोरोना विषाणूमुळे शहरातील लोक धास्तावलेले असतानाच ‘सिव्हिअरली अॅक्युट रेस्पायरेटरी इलनेस’ (सारी) या आजारानेही महाराष्ट्रात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. ‘सारी हा आजार सर्दी, ताप, खोकला यातून निर्माण होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर दोनच दिवसांतच अशा रुग्णांची तब्येत चिंताजनक होते. त्यातच त्याचा मृत्यू होतो. नेमकी हीच लक्षणे कोरोनातही दिसतात. तसेच साथीच्या रोगाने अनेकांचा मृत्यू झाला असून अहमदनगर येथे 15 जणांना सथीच्या रोगाची लागण झाली. यामुळे अहमदनगरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सारीचे 15 रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 28 आहे. यातील तिघे कोरोनामुक्त झाले असून श्रीरामपूरच्या एकाचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. उर्वरित नगरच्या बुथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून यातील दोघांवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहे. हे देखील वाचा- मुंबईत कोरोनामुळे आज 9 जणांचा मृत्यू; शहरात एका दिवसात 150 नवे रुग्ण आढळले तर, आतापर्यंत 1549 लोकांना कोरोनाची लागण
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.