Coronavirus Update: महाराष्ट्रात आजवर 1000 कैदी व 290 हुन अधिक तुरुंगातील कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण
(Photo Credit -file photo)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासुन अगदी सामान्य माणुस ते राजकीय नेते, सेलिब्रिटी सर्वांनाच याचा फटका बसला आहे.सध्या समोर येत असणार्‍या माहितीनुसार राज्यातील कैद्यांमध्ये आढळुन आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा 1000 वर पोहचली आहे. राज्य तुरुंग विभागातर्फे यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली, ज्यानुसार आज, 14 ऑगस्ट पर्यंत राज्यात तब्बल 1000 कोरोनाबाधित कैदी आढळुन आले आहेत, तर यातील 6 जणांचा कोरोनानेच बळी घेतला आहे. यासोबतच 292 कर्मचार्‍यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण?

महाराष्ट्रात मार्च महिन्यामध्ये मुख्यतः कोरोना पसरु लागताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 11 हजार कैद्यांना तातडीने पॅरोल वर सोडण्याचे आदेश दिले होते, तर मे मध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या उच्च-स्तरीय समितीने राज्यभरातील तुरूंगात असलेल्या 50 टक्के कैद्यांना तात्पुरते सोडण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय तुरुंगात असणार्‍या कैद्यांसाठी सुद्धा आयसोलेशन वार्ड उभारुन, कोरोना चाचण्या घेउन सुरक्षा पुरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 381 जणांना कोरोनाची लागण; 3 जणांचा मृत्यू

ANI ट्विट

दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून काल (13 ऑगस्ट) दिवसभरात राज्यात 11 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आली असून 413 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 19,063 रुग्णांची रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे, आतापर्यंत 3 लाख 90 हजार 958 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.