COVID19 Cases In Mumbai: मुंबईत आज 1 हजार 142 नव्या रुग्णांची नोंद; मृतांची एकूण संख्या 7 हजार 690 वर
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) आज आणखी 1 हजार 142 कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 46 हजार 947 वर पोहचली आहे. यापैंकी 7 हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- Maharashtra's COVID19 Tally Crosses 8 Lakh Mark: चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ओलांडला 8 लाखांचा टप्पा; संपूर्ण आकडेवारी घ्या जाणून

एएनआयचे ट्विट-

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशावरुन सोमवारी नवी मार्गदर्शक तत्व जारी करत लॉकडाऊन नियमांना शिथिलता दिली आहे. त्यानुसार अनलॉक 04 घोषीत करण्यात आला आहे. राज्य ससरकारच्या नव्या नियमांनुसार राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करत प्रवासावरील निर्बंध काढल्याची घोषणा केली. नवी मार्गदर्शक तत्व उद्या म्हणजेच 2 सप्टेंबपासून लागू होत आहे. नव्या तत्वांनुसार सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची संख्याही वाढणार आहे. तसेच ई-पासची सक्ती काढून टाकल्यामुळे नागरिकांना मनासारखा प्रवास करता येणार आहे.