Coronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रात 10,425 रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,03,823 वर
Coronavirus (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्रात मागील 24 तासांत 10,425 रुग्ण आढळले असून 329 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,03,823 वर पोहोचली आहे. तर राज्यात मृतांचा एकूण आकडा 329 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात 12,300 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 5,14,790 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात रिकव्हरी रेट हा वाढत असल्यामुळे लवकरच आपण कोरोनावर मात करु अशी आशेची किरणं दिसू लागली आहेत.

राज्यात सद्य घडीला 1,65,921 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रिकव्हरी रेट 73.14% इतका झाला आहे. तर मृत्यूदर 3.24% इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 37,24,911 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. राज्यात सध्या 12,53,273 कोरोना रुग्ण हे होम क्वारंटाईन असून 33,668 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. Coronavirus Update: देशात कोरोना रुग्णांचा आकडा 31 लाख पार, 24 तासात 60,975 नवे रुग्ण, 848 मृत्यु, पहा सविस्तर आकडेवारी

भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येने आज 31 लाखाचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार (Union Health Ministry) मागील 24 तासात कोरोनाच्या रुग्णसंख्येत 60,975 नव्या रुग्णसंख्येची भर पडली आहे. यानुसार देशातील कोरोना रुग्णांंचा आकडा 31,67,324 वर पोहचला आहे, याशिवाय कालच्या दिवसभरात कोरोनामुळे 848 जणांंचा मृत्यु (Coronavirus Fatality) झाल्याने सध्या कोरोना बळींंची संख्या 58,390 इतकी झाली आहे.