महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya) जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे, शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली नसल्याचे अधोरेखित करण्यासाठी हा अयोध्या दौरा होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, अनेक नेते आणि पदाधिकारीही अयोध्येला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागातासाठी फैजाबाद आणि अयोध्येत सर्वत्र बॅनर लावण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शरयू तीरावराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते शरयू तीरावर आरती करणार होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकार जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होतील. शरयू तीरावरचा कार्यक्रम रद्द झाल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. हे देखील वाचा- चलो अयोध्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज Ayodhya येथे घेणार राम लल्लाचे दर्शन; कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शरयू आरती टाळली
ट्वीट-
Mumbai: Maharashtra Chief Minister and Shiv Sena Chief Uddhav Thackeray leaves for Ayodhya. pic.twitter.com/AiG08QyR3M
— ANI (@ANI) March 7, 2020
अयोध्या दौऱ्याचे नियोजन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 2 वाजता लखनऊ विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते गाडीने लखनऊ ते अयोध्या प्रवास करतील. तसेच उद्धव ठाकरे यांची दुपारी 3.30 वाजता अयोध्येत पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता उद्धव ठाकरे रामललाचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते पुन्हा लखनऊकडे रवाना होतील.
25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यापूर्वी उद्धव यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. राम मंदिर हा शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा अजेंडा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते.