Vastu Tips: घरात किंवा कार्यालयात सकारात्मक ऊर्जा कशी आणायची? वास्तु तज्ञांच्या महत्वाच्या टिप्स जाणून घ्या!
प्रतीकात्मक फोटो (Photo: Wikimedia Commons)

प्रत्येकाला अशा घरात किंवा कार्यालयात राहणे किंवा काम करणे आवडते, जे आरामदायक, शांत आणि जीवन आनंदी ठेवते. येथे हे समजून घेणे आवश्यक आहे की घराची उर्जा त्या घरात राहणाऱ्या माणसांवर कशी परिणाम करते. जर घरात किंवा कार्यालयात सकारात्मक ऊर्जेचा संचार असेल तर आयुष्य आनंदी आणि यशस्वी राहते. जेथे नकारात्मक ऊर्जा आयुष्यात सुस्तपणा आणि अपयश आणते, अशा परिस्थितीत हे जाणून घेणे महत्वाचे आहे की सकारात्मक ऊर्जा घर, कार्यालय किंवा कारखान्यात कशी आणता येईल? या विषयावर, गुरगावचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार अमित शास्त्री यांनी वास्तूशी संबंधित काही टिप्स दिल्या आहेत, जेणेकरून तुमच्या घरात, कार्यालयात आणि कारखान्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी पसरेल. (Vastu Tips for Money Plant: कोणत्या दिशेला मनी प्लांटचे झाड लावावे? जेणेकरुन घरात येईल सुख-समृद्धी)

विश्वातील प्रत्येक वस्तूचे मूळ अग्नि, आकाश, प्रकाश, पाणी आणि पृथ्वी या पाच घटकांवर अवलंबून आहे. वास्तुशास्त्र आपल्याला या पाच घटकांमधून उर्जा योग्य प्रकारे व्यवस्थित करण्यास मदत करते. जर वास्तुशास्त्रानुसार आपले घर (निवास, कार्यालय, कारखाना) बांधले गेले नाही तर नकारात्मक उर्जेचा संचार आपल्या घरात आणि जीवनात होतो. आज आपण या नकारात्मक ऊर्जा दूर करणाऱ्या आणि सकारात्मक उर्जा वाढवणाऱ्या तथ्यांवर चर्चा करूयात.

* सकारात्मक ऊर्जेसाठी, आपल्या निवासस्थान, कार्यालय किंवा कारखाना इत्यादीच्या मुख्य खोलीत पाच रंगांचा पुष्पगुच्छ ठेवा. सुगंधी फवारणी करून ती खोली सुगंधी बनवा.

* घराच्या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. कोणत्याही नळामधून पाण्याची गळती होणार नाही याची खात्री करा.

* तुमच्या निवासस्थानामध्ये, कार्यालयात किंवा कारखान्यात, पूर्व आणि उत्तर दिशेने हलका रंग आणि दक्षिण पश्चिम दिशेला गडद रंग दया.

* तुमच्या घराचा, कार्यालयाचा किंवा कारखान्याचा पूर्व-उत्तर भाग नेहमी स्वच्छ ठेवा आणि काही काळ खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा.

* घरात एक मत्स्यालय ठेवा ज्यामधले पाणी घराच्या उत्तर-पूर्व दिशेने फिरत असेल.

* स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारचे औषध ठेवू नका.

* मुख्य प्रवेशद्वारावर कधीही डस्टबिन ठेवू नका

* घरात शांतता राखण्यासाठी दिवसातून दोनदा (सकाळी आणि संध्याकाळी) कापूर जाळा आणि चंदन सारख्या सुगंधी वस्तू वापरा.

* घरातून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी समुद्री मीठ सर्वोत्तम मानले जाते. तुम्ही ते तुमच्या घरात एका भांड्यात ठेवू शकता आणि मोपिंगसाठी वापरलेल्या पाण्याने ते पुसून टाकू शकता.

* घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याचा नाल लावल्याने सकारात्मक ऊर्जाही वाढते.

* लिव्हिंग रूममध्ये कुटुंबातील सदस्यांची चित्रे लावल्याने नाती मजबूत होतातच, पण सकारात्मकताही येते.

* घराच्या मंदिरात शंख, बासरी आणि त्रिशूल बसवल्याने नकारात्मक ऊर्जा संपते.

*तुमच्या तिजोरीत किंवा जेथे तुम्ही पैसे ठेवता तेथे 11 कवड्या , 11 कमळ गट्टे आणि थोडी पिवळी मोहरी ठेवा.

* घरात बंद घड्याळे ठेवू नका. तसेच सुरु असलेली घड्याळे उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.