Extramarital Affairs | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

विवाहीत महिलेला पती ( Married Lady) आणि दोन अपत्ये असतानाही कोर्टाने तिच्या मित्रासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने पतीद्वारा दाखल Corpus Plea फेटाळत महिलेला ही परवानगी दिली. उत्तारखंड हायकोर्टाने (Uttarakhand High Court) हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीने परत आपल्यासोबत राहायला यावे तसेच पत्नीचा पुन्हा ताबा मिळावा यासाठी पतीने कोर्टाकडे याचिका केली होती. मात्र, महिलेला तिच्या मर्जीने मित्रासोबत राहण्यास ( Married Lady To Stay With 'Friend') कोर्टाने परवानगी दिली.

याचिकाकर्ता आणि महिला यांचा विवाह सन 2012 मध्ये झाला. या विवाहातून त्यांना मुलगा, मुलगी अशी दोन आपत्ये झाली. जी अनुक्रमे 10 आणि 6 वर्षांची आहेत. दरम्यान, पतीसोबत नांदत असताना महिला ऑगस्ट 2022 मध्ये अचानक एके दिवशी फरीदाबाद (Faridabad) येथे गेली. तिथे तिचे आई-वडील राहात असत. दरम्यान, आईकडे गेलेली ही विवाहीत महिला पुन्हा सासरी म्हणजेच पतीकडे परतलीच नाही. (हेही वाचा, Lesbian Partner Detained By Parents Case: लेस्बियन पार्टनरला कुटुंबीयांनी जबरदस्तीने केले विलग, तरुणीची हायकोर्टात याचिका)

प्रदीर्घ काळ वाट पाहून दमलेला महिलेचा पती (याचिकाकर्ता) घाबरला आणि त्याने पत्नी परत यावी यासाठी कोर्टाकडे याचिका दाखल केली. यात याचिकार्त्याने म्हटले की, प्रतिवादी म्हणजेच त्याची पत्नी प्रतीवादी क्रमांक 9 म्हणजेच तिच्या मित्रासोबत राहते. तिने आपल्याकडे परत यावे. आपल्या पत्नीचा ताबा मिळावा.

ट्विट

दरम्यान, या खटल्यात अनेक सुनावण्या पार पडल्या. शेवटच्या सुनावणीला याचिकाकर्ता आणि प्रतिवादी अशा दोघांना प्रत्यख हजर राहण्यास कोर्टाने बजावले होते. त्यानुसार दोघेही कार्टात हजर होते. दरम्यान, महिलेने सांगितले की, आपला आगोदरचा जोडीदार म्हणचेच तिचा पती हा तिचा छळ करत असे. तिच्याशी गैरवर्तन करत असे. त्यामुळे आता त्याला त्याची सोबत नको आहे. तिच्या मित्रासोबत ती खुश आहे. कोर्टाने महिलेचा दावा मान्य करत तिला तिच्या मित्रासोबत राहण्याची परवानगी दिली.