प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

सेक्समध्ये (Sex) स्त्री आणि पुरुष दोघांच्याही ठराविक अपेक्षा असतात. पुरुषांना जितका संभोग (Intercouce Sex), महत्वाचा असतो, तितका तो स्त्रियांना महत्वाचा असेलच असे नाही. जोडीदाराने सेक्समध्ये काही ठराविक गोष्टी कराव्यात असे स्त्री आणि पुरूष दोघांनाही वाटत असते. मात्र आपल्या लिंगाच्या आकारामुळे आपण स्त्रीला पूर्णतः संतुष्ट करू शकू का नाही ही भीती बऱ्याच पुरुषांच्या मनात असते. मात्र लक्षात घ्या स्त्रीला सेक्समध्ये लिंगाच्या मोठ्या आकारापेक्षा इतर काही गोष्टींची अपेक्षा असते. म्हणजेच त्यांच्यासाठी सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो.

प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. महत्वाचे म्हणजे स्त्रीच्या योनीत जाऊन त्यात शुक्राणू सोडण्याइतपत लिंगाची लांबी गरजेचे आहे. पुरुषाचे शिश्न ताठ असलेल्या अवस्थेत दोन इंच लांब असेल तरी स्त्रीला सेक्समध्ये पूर्ण आनंद मिळू शकतो. त्यामुळे लिंगाच्या आकाराबद्दल घाबरून न जाता दोघांना ज्या गोष्टी हवी आहेत त्या देणे याच्यावर भर ठेवा. सहसा स्त्रिया या संभोगाने नाही तर स्पर्शाने उत्तेजित होतात. त्यांना लिंग-योनीच्या संबंधापेक्षा शरीराचे मिलन जास्त महत्वाचे असते. त्यामुळे संभोगापेक्षा शारीरिक दृष्ट्या तुम्ही दोघे एकमेकांशी कम्फर्टेबल असणे गरजेचे आहे.

फोरप्ले -

सेक्समध्ये नेहमी फोरप्लेला महत्व द्या. फोरप्लेचा अनुभव हा सेक्सपेक्षाही खूप सुंदर आणि रोमँटिक असतो. जोडीदाराला जवळ घेऊन, शरीराच्या विविध भागांवर स्पर्श करा, यामुळे स्त्रिया लवकर उत्तेजित होतात. त्यानंतर चुंबन, मिठी, आवेगाने शरीरावर केलेले किसिंग, योनीचा ओठांनी केलेला मसाज अशा गोष्टी  स्त्रियांना फार आवडतात. त्यामुळे संभोग करण्यापूर्वी फोरप्ले जरुरू करा.

स्पर्श -

सेक्स करताना महिलांच्या तुलनेत पुरुष खूप लवकर उत्तेजित होतात. मात्र महिलांना उत्तेजित होण्यास थोडा वेळ लागतो. अशावेळी स्त्रीला स्पर्शाने उत्तेजित करणे केव्हाही चांगले. स्त्रीच्या शरीरात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्पर्श केल्याने त्यांना लैंगिक उत्तेजना मिळू शकते. त्यामुळे संभोग करण्याआधी हळुवारपणे शरीराला स्पर्श केल्याने स्त्रियांना संभोगापेक्षाही जास्त आनंद मिळू शकतो. बेंबी, स्तन, योनी, मांड्या, मान अशा जागी केलेला स्पर्श आणि चुंबन स्त्रियांना फार आवडते.

(हेही वाचा: लिंगाच्या लहान आकारामुळे निराश? जाणून घ्या स्त्रीला Sex मध्ये संतुष्ट करण्यासाठी पुरुषाचे शिश्न किती लांबीचे असावे)

जोडीदाराचा आदर करा –

सेक्समध्ये जोडीदारावर हक्क गाजवण्याऐवजी त्याच्या मनाचा आणि भावनांचा आदर करा. यासाठी सर्वात आधी संवाद साधून एक भावनिक नाते निर्माण करा. महिलांना रोमँटीक वातावरणात सेक्स करायला आवडतो. कँडल, गुलाबाच्या पाकळ्या, संगीत, दरवळणारा गंध अशा वातावरणात महिला जास्त उत्तेजित होतात. त्यामुळे या गोष्टी अरेंज करायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या सेक्स ही ओरबाडून घेण्याऐवजी हळुवार अनुभवण्याची गोष्ट आहे.

(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)