राशीभविष्य 29 जून 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

29 जून  2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष:  आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

शुभ उपाय- हिरव्या रंगाच्या बुटांचा वापर करा

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा

शुभ अंक- 7

शुभ रंग- हिरवा

वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे . परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका.

शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा

शुभ दान- गरजूंना मदत करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल

मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा

शुभ दान- अंथरुण दान करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- पिवळा

कर्क: मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल

शुभ उपाय- शंकराची पूजा करा

शुभ दान- भिक्षुकाला दान करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- पांढरा

सिंह: घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

शुभ उपाय- देवाला दुधाने स्नान घाला

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा

शुभ अंक-7

शुभ रंग- आकाशी

कन्या: घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

तुळ: ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- निळकंठाची पूजा करा

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

वृश्चिक: आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्‍यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या

शुभ दान- जेवण दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

धनु: व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.

शुभ उपाय-स्नान झाल्यावर देवाची पूजा करा

शुभ दान- रक्तदान करा

शुभ अंक-5

शुभ रंग-करडा

मकर: कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- जांभळा

कुंभ: गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाह राहू नका. मानप्रतिष्ठा भंग पावेल.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

मीन: आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी