Horoscope Today आजचे राशीभविष्य, शनिवार 3 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today

Horoscope Today 3 June 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, शनिवार 3 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शारीरिक श्रमाचा असेल. आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक राहू शकते. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. जवळच्या व्यक्तीसोबत काही मतभेद होतील. संध्याकाळी कुटुंबासोबत थोडा वेळ व्यतीत करा, मनातील गोंधळ कमी होईल.

शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा.

शुभ दान- वृद्धाश्रमातील व्यक्तींना वस्त्रदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- लाल

वृषभ (Taurus Horoscope Today): वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करावा. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता. कामात घाईगडबड करू नका. वरिष्ठांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे एखादी चांगली संधी प्राप्त होऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये जोडीदाराचा मिळालेला सल्ला फायद्याचा ठरेल.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- गरजूला धान्य दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा

मिथुन (Gemini Horoscope Today): व्यवसायासाठी उत्तम वेळ, तसेच नवीन कामात यश मिळण्याची शक्यता. आज कामानिमित्त केलेला प्रवास फायद्याचा ठरू शकेल. पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी येतील मात्र घाई करू नका. पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे बाहेरचे खाणे टाळा.

शुभ उपाय- शनि देवाची उपासना करा.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- निळा

कर्क (Cancer Horoscope Today): तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- हिरवा

सिंह (Leo Horoscope Today): आज नोकरी-व्यवसायातील अनेक कामे पूर्ण होतील. दिवस धावपळीचा असेल मात्र संध्याकाळी सुखद धक्का मिळण्याची शक्यता. जोडीदाराचे मन दुखवू नका. आज भागीदारीत कोणतीही गोष्ट सुरु करणे टाळा. खर्च करताना मनावर आणि खिशावर ताबा ठेवा. आज उसने पैसे देणे टाळा.

शुभ उपाय- घराबाहेर पडताना लाल फुल खिशात ठेवा.

शुभ दान- लाल रंगाचे वस्र दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- करडा

कन्या (Virgo Horoscope Today): आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. जिभेवर ताबा राहू द्या. जुने जोडलेले बंध किंवा नाती आज उपयोगी पडू शकतील. इलेक्ट्रिक गोष्टींपासून शक्यतो दूर रहा. आज कोणालाही कसलीही वचनबद्धता देणे टाळा.

शुभ उपाय- कुलस्वामिनीची उपासना करा.

शुभ दान- मंदिरात ऐपतीप्रमाणे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- जांभळा

तुळ (Libra Horoscope Today): आज विचारपूर्वक गुंतवलेले धन ध्येयाजवळ घेऊन जाईल. नोकरी-व्यवसायात जोखमीची किंवा कोर्ट कचेरीची कामे टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कोणी मदतीची याचना केल्यास नकार देऊ नका. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

शुभ उपाय- हनुमानाची उपासना करा.

शुभ दान- गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): वृश्चिक राशीतील व्यक्तींना आजचा दिवस उत्तम आहे. मनासारखी कामे होण्याची शक्यता. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. कोर्ट-कचेऱ्यासंबंधी पश्न निकालात लागण्याची शक्यता. मात्र व्यवसायामध्ये जोडीदारावर पूर्णतः विश्वास टाकू नका. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास भविष्यात उत्तम फळ मिळेल.

शुभ उपाय- गणपतीची आराधना करा.

शुभ दान- गुळ दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

धनु (Sagittarius Horoscope Today):  नवीन गोष्टी शिकण्यास आजचा दिवस उत्तम असेल. नवीन सुरु केलेल्या कार्यात मनाजोगे यश मिळेल. आज स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. आत्मचिंतन केल्यास अनेक प्रश्न सुटतील. चित्त शांत ठेऊन निर्णय घ्या. कठीण निर्णय घेताना कुटुंबाची साथ लाभेल.

शुभ उपाय- सकाळी घराबाहेर पडताना कुलदेवतेची पूजा करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- गुलाबी

मकर (Capricorn Horoscope Today): आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. आज आपल्या जुन्या लोकांची किंवा मित्रांची साथ लाभेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

शुभ उपाय- देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गाईला चारा घाला.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

कुंभ (Aquarius Horoscope Today): इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. कुटुंबासाठी खर्च होण्याची शक्यता. प्रवास काळजीपूर्वक करा.

शुभ उपाय- सकाळी लवकर उठून सूर्य देवतेची पूजा करा.

शुभ दान- एखादी धातूची वस्तू गरजूला दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- लाल

मीन (Pisces Horoscope Today): आपल्या स्वभावातील नम्रतेमुळे अनेक कार्ये तडीस जातील. कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम राहील. वरिष्ठांसोबतचे संबंध चांगले ठेवा. नवीन संधी मिळतील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचा व्यय होईल. व्यापार वर्गासाठी दिवस संमिश्र राहील.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पांढरा