Photo Credit: Pixabay

'आम के आम गुठलियों के दाम' तुम्ही ही म्हण ऐकली असेलच. आज आम्ही तुम्हाला बियांचे महत्व सांगणार आहोत पण पण आंब्याच्या बिया म्हणजेच कोयीचे नाही तर जांभूळाच्या  बियांचे . आपण बर्‍याचदा जांभूळ  खाऊन फेकतो.आज या जांभूळाच्या बियांचे फायदे आणि गुण आपण जाणून घेणार आहोत. जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.चला तर मग जाणून घेऊयात जांभूळाच्या बियाचे फायदे.आयुर्वेदानुसार मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी जांभूळ फळ हे उत्तम औषध आहे. जांभूळाच्या बिया वाळवून पावडर बनवतात. हे भुकटी रिकाम्या पोटी घेतल्यास मधुमेह किंवा मधुमेह यासारख्या आजारांमध्ये अफाट फायदा होतो. साखर नियंत्रणात राहते आणि त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य इन्जॉय करू शकता. (Advantage of Anjeer: वेगळी चव असण्याबरोबरच जाणून घ्या अंजीर चे हे '10' महत्वाचे उपयोग )

जांभूळाच्या बियांपासून पावडर बनविणे खूप सोपे आहे. जांभूळ  खाल्ल्यानंतर बिया धुवा. त्यांना पाताळ कपड्याने झाकून उन्हात वाळवा.शक्यतो जॉर्जेट किंवा शिफॉन कपड्याचा वापर करा कारण ते पातळ आणि हलके असतात. किंवा सूती फॅब्रिक योग्य ठरेल . जेव्हा जांभूळाच्या बिया   कोरड्या होतील तेव्हा त्याचे तुकडे करा. यासाठी तुम्ही खलबत्त्याचा वापर करू शकता.ननतर त्याची बारीक पावडत/ पेस्ट करुन घ्या. मिक्सर च्या साहाय्याने अगदी पटकन होईल.आणि ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी पाण्याने बरोबर घ्या. (White Onion Health Benefit: फक्त रोगप्रतिकार शक्तिच नाही तर केसगळती ही थांबते, पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे )

काही जण या बिया नुसत्याच तोंडात टाकून चघळणे ही पसंत करतात मात्र त्या कडू किंवा तुरट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पावडर है पर्याय चांगला ठरू शकतो.आयुर्वेदिक औषधांचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नसला तरीही, हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घेतले पाहिजे. जांभूळाच्याबियांच्या फायद्यांविषयी आम्ही येथे तुम्हाला सांगितले आहे. जेणेकरून आपण इतर औषधांचे दुष्परिणाम टाळू शकता.

(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)