World Labour Day 2020 | File Photo

World Labour Day 2020 HD Images: 1 मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' किंवा 'जागतिक कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी हा विशेष दिन पाळण्यात येतो. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला. परंतु, त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधेअभावी कामगारांना 12-14 तास काम करावे लागत होते. या पिळवणूकीविरोधात सर्व कामगारांनी एकत्र येत कामगार संघटनांची निर्मिती केली. तसंच दिवसाला केवळ 8 तास कामाची मागणी करण्यात आली. मात्र उद्योजक जुमानत नसल्याने कामगारांनी आंदोलन केले. या आंदोलनाला व्याप्त स्वरुप प्राप्त झाले. तसंच कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली. त्यानंतर 1891 पासून 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी जगातील तब्बल 80 देशांमध्ये सुट्टी असते. कामगार दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसंच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगारांचा कामगार संघटना, उद्योजक किंवा सरकारतर्फे गौरव करण्यात येतो.

यंदा कोरोना व्हायरसचे सावट असल्याने कोणतेही कार्यक्रम कामगार दिनानिमित्त होणार नाहीत. मात्र तुमच्या-आमच्यातील कामगाराच्या सन्मान करण्यासाठी काही शुभेच्छापत्रं, ग्रीटिंग्स, संदेश, HD Images सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर करा. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यावर ही शुभेच्छापत्रं शेअर करुन कामगार दिनाच्या शुभेच्छा द्या.

कामगार दिन शुभेच्छापत्रं!

World Labour Day 2020 (1)
World Labour Day 2020 | File Photo
World Labour Day 2020 (5)
World Labour Day 2020 | File Photo
World Labour Day 2020 (3)
World Labour Day 2020 | File Photo
World Labour Day 2020 (4)
World Labour Day 2020 | File Photo
World Labour Day 2020 (2)
World Labour Day 2020 | File Photo

Maharashtra Day Messages महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश, Wishes, WhatsApp Status

भारतातील पहिला कामगार दिन 1 मे 1923 रोजी चेन्नईत पाळण्यात आला होता. चेन्नईतील उच्च न्यायालयासमोर असलेल्या जागेत कामगार दिनाचा कार्यक्रम पार पडला होता. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला असून त्यावेळी कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी याच्या आयोजनात पुढाकार घेतला होता.