International Coffee Day 2019: कॅफे मद्रास, रामाश्रय यांच्यासह  मुंबईतील 'या' पाच उडिपी हॉटेल मधील कॉफी आहे महागड्या कॅफेपेक्षा सुद्धा भारी
Filter Coffee (Photo Credits: Instagram)

प्रेमाच्या खास क्षणांची आठवण करून देणारी.. झोप उडवणारी.. अशी कॉफी (Coffee) आणि तिच्याशी जोडलेले अनेक किस्से आजवर आपण अनुभवले किंवा ऐकले असतील. असं म्हणतात की खरपूस चॉकलेटी रंगाच्या या कॉफी बियांचा सुगंध पार अरसिक माणसाला सुद्धा तिचे वेड लावू शकतो. अनेकांच्या तर सकाळची सुरवात सुद्धा कॉफीशिवाय होत नाही, अशी खास ओळख असणाऱ्या या पेयाच्या सन्मानासाठी जागतिक स्तरावर आज म्हणजेच 1  ऑक्टोबर रोजी जागतिक कॉफी दिवस (International Coffee Day)  साजरा केला जातो. आपल्याकडे दक्षिण भारतात कॉफीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते, साहजिकच त्यामुळे तिथल्या कॉफीची चव ही अगदी अस्सल रूपात चाखायला मिळते, अर्थात कॉफी पिण्यासाठी एवढ्या लांब जाणे प्रत्येकालाच शक्य होते नाही, अश्यांसाठी मुंबईतील ही पाच उडिपी हॉटेल्स उत्तम पर्याय ठरतात.

चला तर मग आजच्या जागतिक कॉफी दिनाचे औचित्य साधून अगदी बड्या आणि महागड्या कॅफेला सुद्धा मागे टाकेल अशा उडिपी हॉटेल्सची एक सैर करूया.. पाहुयात मुंबईतील पाच कॉफीसाठी प्रसिद्ध ठिकाणे..

रामाश्रय

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाला लागूनच असणाऱ्या रामाश्रय हॉटेल मध्ये सकाळपासूनच कॉफी रसिकांची खास गर्दी पाहायला मिळते. त्याठिकाणची फिल्टर कापी आणि सकाळी पाच वाजल्यापासूनच विकला जाणारा खास अननसाचा शिरा हे समीकरण म्हणजे खवय्यांसाठी मेजवानी म्हणता येईल.

 

View this post on Instagram

 

Evening coffee with Goli bhajj and Butterscotch Shira 😋 #eveningcoffee #filtercoffee #ramashraya #mumbi

A post shared by Niraja Bhagat (@niraja_bhagat) on

कॅफे मद्रास

माटुंग्यातीलच कॅफे मद्रास हे आणखीन एक जुने आणि अस्सल दाक्षिणात्य हॉटेल आहे. या ठिकाणी कप वा फॅन्सी भांड्यात कॉफी सर्व्ह करण्यापेक्षा पारंपरिक पेल्याचा वापर केला जातो. दाक्षिणात्य हॉटेलची ही खासियत मानली जाते.

आर्य भवन

माटुंगा स्थानकाच्या अगदी समोर आर्य भवन हे जुने उडिपी हॉटेल आहे. याठिकाणी कॉफी सर्व्ह करण्याची पद्धत आणि वेष्टी नेसून सर्व्ह करणारे वेटर हे लक्षवेधी ठरतात. एका पेल्यातून दुसऱ्यामध्ये कॉफी ओततानाचे कसब हे बघण्यासारखे आहे.

कॅफे म्हैसूर

किंग्स सर्कल मधील कॅफे म्हैसूर हे १९३० साली प्रचलित झाले आहे. आजूबाजूच्या परिसरात अनेक कॉलेज व शैक्षणिक संथा असल्याने या हॉटेल मध्ये नेहमीच तरुणांचा गराडा पाहायला मिळतो. थोडक्यात सांगायचं झालं तर हे हॉटेल कॉलेजियन्सचा कॉफी अड्डा आहे असे म्हणता येईल.

दक्षिणायन, जुहू

जुन्या उडिपी हॉटेल्सच्या यादीतील हे नाव साऊथ इंडियन पदार्थांचे वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. याठिकाणी मिळणारी फिल्टर कॉफी ही ही अगदी स्ट्रॉंग आणि अगदी गोड यांच्यातील सुवर्णमध्य साधणारी असते.

 

View this post on Instagram

 

#filtercoffee

A post shared by Adrija Bhattacharya (@bhattacharya_adrija) on

यंदाच्या कॉफी दिवशी या ठिकाणांना भेट देऊन तुमच्या गॅंग सोबत सेलिब्रेशन करू शकता.