Vitthal Rukmini Vivah Sohla 2023: वसंत पंचमी च्या मुहूर्तावर आज विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळा; अज्ञात भाविकाकडून पावणे दोन कोटी रूपयांचे सोन्याचे दागिने दान
Vitthal Rukmini | Wikimedia commons and AIR Pune Twitter Account

वसंत पंचमी (Vasant Panchami) च्या मुहूर्तावर दरवर्षी विठ्ठल-रूक्मिणीचा विवाह सोहळा (Vitthal Rukmini Vivah Sohla) पार पडतो. यंदा हा सोहळा आज (26 जानेवारी) दिवशी पार पडणार आहे. दरम्यान या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरात (Pandharpur) तयारी सुरू आहे. पण यंदाच्या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे विठ्ठल रूक्मिणी मातेला आलेले सोन्याचे दागिने आणि भरजरी वस्त्रं. एका अज्ञात भाविकाने पंढरपूर मंदिरात विठ्ठल आणि रूक्मिणी मातेसाठी सुमारे पावणे दोन कोटीचे दागिने दान केले आहेत. हे मंदिर समितीच्या इतिहासामधील सर्वात मोठे दान आहे.

दान स्वरूपात आलेल्या या सोन्याच्या दागिन्यांमध्ये विठ्ठल आणि रूक्मिणी मातेला मुकूट, मातेला मंगळसूत्र, बांगड्या, हार यांचा समावेश आहे. आज विवाह सोहळ्यामध्ये ते वापरून साजशृंगार केला जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून या विवाहसोहळ्याच्या विधींना सुरूवात होते तर दुपारी मध्यान्हावर अर्थात 12 वाजता हा विवाह सोहळा संपन्न होतो. मंगलाष्टक गाऊन विठू माऊली व रूक्मिणी मातेवर अक्षता अर्पण केल्या जातात.

विठुराया आणि रुक्मिणी मातेचे दागिने

आकर्षक रोषणाई

दरम्यान आज प्रजासत्ताक दिन देखील असल्याने विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिराला तिरंग्याची आकर्षक रोषणाई केली आहे. फुलांच्या मदतीने तिरंगा साकारण्यात आला आहे.