![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/Vilasrao-Deshmukh-380x214.jpg)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांची आज 76 वी जयंती (Vilasrao Deshmukh 76th Jayanti). सर्वसामान्य नागरिक, एक ग्रामपंचायत सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पुढे केंद्रीय मंत्री अशी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची नेत्रदीपक राजकीय कामगिरी. एक हसतमुख, हजरजबाबी आणि वक्तृत्वकौशल्याचा उत्कृष्ठ नमुना (Vilasrao Deshmukh Famous Speech) म्हणजे विलासराव देशमुख. वायाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. विलासरावांचा मृत्यू हा खरोखरच अनेकांना धक्कादायक आणि तितकाच चटका लावणारा होता. भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोघांचेही अचानक झालेले मृत्यू महाराष्ट्रासाठी अत्यंत नुकसानकारक ठरले. महत्त्वाचे म्हणजे दोघेही लोकनेते होते आणि परस्परांचे मित्र होते. दोघांचेही वक्तृत्वावर प्रभुत्व होते. आज विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गाजलेल्या भाषणांच्या काही स्मृती इथे देत आहोत.
विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1645 या दिवशी लातूर जिल्ह्यातील बाभुळगाव येथे झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंचे शिक्षण घेतले. त्यांनी कला आणि विज्ञान अशा दोन्ही शाखेतून शिक्षण घेतले आहे. पुण्यातील इंडियन लॉ सोसाइटी लॉ कॉलेज येथून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. देशमुख यांना सुरुवातीपासूनच राजकारण, समाजकारण याची आवड होती. त्यामुळे ते विद्यार्थीदशेतूनच चळवळीत सहभागी होत. विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विलासराव यांनी अनेक पदं भूषवली. खास करुन एक ग्रामपंचायत सरपंच (Sarpanch) ते मुख्यमंत्री (Chief Minister) आणि पुढे केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.
विलासराव देशमुख भाषण व्हिडिओ
राजकारणात सक्रीय झाल्यापासून विलासराव आणि महाराष्ट्रातील विविध औद्योगिक घराण्यांशी सौगार्दपूर्ण संबंध राहिले. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर विलासराव देशमुख यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी आली. जी त्यांनी यशस्वी पार पाडली. विलासरावांनी काँग्रेस पक्षात संघटनात्मक कामही चांगले केले. ते यूवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी आपल्या नेतृत्वाच्या काळात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. (हेही वाचा, Vilasrao Deshmukh Death Anniversary: दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सरपंच ते मुख्यमंत्री पदापर्यंतच्या अद्भूत प्रवासाविषयी काही खास गोष्टी)
विलासराव देशमुख भाषण व्हिडिओ
गोपीनाथ मुंडे भाषण व्हिडिओ
विलासराव देशमुख याची यशाचा आलेख चढता राहिला असला तरी तो सोपा कधीच नव्हता. त्यांना काही वेळा पराभवही सहन करावा लागला. 1995 मध्ये विलासराव देशमुख यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी आला. पुढे 1999 मध्ये पुन्हा त्यांचे आमदार म्हणून पुनरागमन झाले. तेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, काही काळातच त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली. पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा संधी दिली. 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवरी 2003 या कळात विलासराव मुख्यमंत्री राहिले. त्यानंत 7 सप्टेंबर 2004 ते 5 डिसेंबर 2008 या काळात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री राहिले. दरम्यान, मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला. विलासराव देशमुख यांनी उद्योग, संसदीय कामकाज, ग्रामीण विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या अनेक खात्यांवर मंत्री म्हणून काम पाहिले. विलासराव देशमुख मुंबई क्रिकेट एशोसिएशनचे अध्यक्षही होते.