Vat Purnima 2023 Special Rangoli Design: वट सावित्री प्रमाणेच वट पौर्णिमा व्रत हिंदू संस्कृतीत अतिशय शुभ मानले जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी वट पौर्णिमा व्रत करतात. एकीकडे ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला वट सावित्री व्रत पाळले जाते, तर दुसरीकडे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. स्त्रिया वडाच्या झाडासह सावित्री आणि सत्यवानाची पूजा करतात. पूजेच्या वेळी महिला वडाच्या झाडाला कच्च्या सुताने गुंडाळून सात वेळा प्रदक्षिणा मारतात आणि या व्रताची कथा वाचतात किंवा ऐकतात. दरम्यान, वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी खूप महत्वाचा सण आहे. दरम्यान, कोणतेही व्रत असेल किंवा सण त्याची सुरुवात रांगोळीने होते. दरम्यान, आम्ही काही रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही वटपौर्णिमेनिमित्त सुंदर रांगोळी काढू शकता.
वट पौर्णिमेनिमित्त सुंदर रांगोळी व्हिडीओ, पाहा
वट पौर्णिमेनिमित्त आकर्षक रांगोळी व्हिडीओ
वट पौर्णिमेनिमित्त हटके रांगोळी व्हिडीओ
वट पौर्णिमेनिमित्त हटके रांगोळी व्हिडीओ
वट पौर्णिमेनिमित्त सुंदर रांगोळी व्हिडीओ, पाहा
वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्याचा सण मानला जातो. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा या उत्तर भारतीय राज्यांमध्ये स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ अमावस्येला उपवास करतात, ज्याला वट सावित्री व्रत म्हणतात. तर महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतात महिला ज्येष्ठ पौर्णिमेला हा उपवास करतात, याला वट पौर्णिमा म्हणतात.