Tulsi Vivah 2024 | File Image

महाराष्ट्रात तुलसी विवाह सोहळा (Tulsi Vivah) 13 नोव्हेंबर पासून सुरूवात होणार आहे. लक्ष्मीच्या रूपात तुळशी माता आणि विष्णूच्या रूपात शाळीग्राम यांचा विवाह या निमित्ताने केला जातो. दिवाळीची सांगता या तुलसी विवाहाने केली जात असल्याने हा दिवसही धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यामुळे या दिवस मंगलमय वातावरणामद्ये साजरा करण्याची पद्धत आहे. काही घरांमध्ये तुळशीला नववधू प्रमाणे सजवून तिचा घरातील लहान मुलासोबत प्रातिनिधिक स्वरूपात विवाह लावून दिला जातो. मग अशा या आनंदमय दिवसाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes द्वारा देत आजचा दिवस साजरा केला. Tulsi Vivah Mangalashtak Lyrics: तुळशीचं लग्न लावताना अचूक मंगलाष्टकं गाण्यासाठी इथे पहा त्याचे शब्द.  

तुळशीच्या लग्नानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक घरात लग्नसराईला सुरूवात होते. त्यामुळे तुळशीच्या विवाहाची धामधूम असते. तिन्ही सांजेच्या वेळी हा लग्न विधी केला जातो. मंगलाष्टक गाऊन साग्र संगीत पणे हा सोहळा पार पाडला जातो. Tulsi Vivah 2024 Wishes In Marathi: तुळशी विवाहाच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारे देत मंगलमय करा आजचा दिवस! 

तुळशीच्या लग्नाच्या शुभेच्छा

Tulsi Vivah 2024 | File Image
Tulsi Vivah 2024 | File Image
Tulsi Vivah 2024 | File Image
Tulsi Vivah 2024 | File Image
Tulsi Vivah 2024 | File Image

 

तुळशीच्या लग्नानिमित्त गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. सामुहिक पद्धतीने देखील हा तुळशीच्या लग्नाचा विधी केला जातो. तुळशीचं लग्न घरात लावून मुलींनाही कृष्णासारखा मनासारखा वर मिळण्यास मदत होते अशी काहींची धारणा आहे. त्यामुळे घरा घरात तुळशीच्या लग्नाची धामधूम असते.