महाराष्ट्रात यंदा श्रावण महिन्याला 9 ऑगस्ट पासून सुरूवात होणार आहे. यंदा योगायोगाने श्रावण महिन्याची सुरूवात आणि पहिला सोमवार (Shravani Somvar) एकाच दिवशी आहे. त्यामुळे यंदा हिंदू धर्मियांसाठी श्रावण महिन्याची (Shravan Maas) सुरूवात अजूनच खास होणार आहे. हिंदू कॅलेंडर्स नुसार, श्रावण महिना हा पाचवा महिना आहे. तर हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. हिंदू पुराणकथांनुसार, भगवान शंकराने समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष प्राशन करून मनुष्य जातीवरील संकट दूर केले त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी विशेष व्रत केले जाते. आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या मंगलपर्वाच्या शुभेच्छा मराठी मेसेजेस, संदेश, Wishes, WhatsApp Status, GIFs, Greetings द्वारा शेअर करून आनंद शेअर करायला विसरू नका. Shravani Somvar 2021 Dates: शिवशंकराच्या भक्तांसाठी खास असलेल्या श्रावणी सोमवार व्रत यंदा 9 ऑगस्टपासून; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?
यंदा श्रावण महिना 9 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. त्यामध्ये 5 श्रावणी सोमवार साजरे केले जाणार आहेत. त्याची सुरूवात आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारचा आनंद आज तुमच्या प्रियजणांना या लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेल्या मराठमोळ्या ग्रिटिंग्सना सोशल मीडीयात शेअर करून नक्की द्विगुणित करा.
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा
शिव शंकराची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो
हीच महादेवा चरणी प्रार्थना
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा
वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव
माझ्या प्रिय जनांना
हीच प्रार्थना
शिव शंभो शंकराला
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!
आजपासून सुरू होणारा श्रावण महिना
आणि श्रावणी सोमवारांचे व्रत तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, भरभरा घेऊन येवो हीच सदिच्छा
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा
पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
यंदा देखील कोरोना संकट अद्याप पूर्णपणे शमलेले नसल्याने धार्मिकस्थळं, प्रार्थना स्थळ बंद असल्याने श्रावणी सोमवार निमित्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी मंदिरात जाणं शक्य नाही. त्यामुळे घरातच राहून महादेवाची आराधना करावी लागणार आहे.