Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जन्मसोहळ्याचा आज जगभरात मोठा उत्साह साजरा केला जात आहे. दरम्यान आज शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांचा जन्म राजे शहाजी आणि माता जिजाबाई यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. आज जगभरात शिवाजी महाराजांची 390 वी जयंती (Shiv Jayanti) मोठ्या धामधुमीमध्ये साजरी केली जात आहे. शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यापासून गल्लीपासून दिल्ली पर्यंत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रयतेचा राजा म्हणून आजही मराठी माणसाच्या मनात आदराचं स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वाला, पराक्रमाला सलाम करताना जाणून घ्या महराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या या महापराक्रमी राजाचं नाव शिवाजी कसं पडलं? Shiv Jayanti 2020 Marathi Wishes: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश, Messages, Whatsapp Status, Greetings आणि शुभेच्छापत्रं शेअर करुन साजरा करा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव!
दासायन लेखातील संत रामदास यांच्या संदर्भानुसार, शिवाजी महाराजांच्या जन्मासाठी माता जिजाऊंनी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावरी शिवाई देवीकडे नवस केला होता. देवीने प्रकट स्वरूपात जिजाऊंच्या अंगात संचार करून ’प्रत्यक्ष सांबसदाशिव तुझ्या पोटी अवतार घेणार असून तोच तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे’ असा आशीर्वाद दिला होता. महाराष्ट्रावरील मोघलांचं आक्रमण परतवून लावण्यासाठी आणि राज्यात स्वराज्याची स्थापना व्हावी म्हणून माझ्या पोटी मुलचा जन्म व्हावा तसं झाल्यास त्यांचं नाव आई शिवाई तुझ्यानावारून ठेवलं जाईल असा नवस जिजाईंनी केला होता. त्यामुळेच देवीच्या नावावरून 'शिवाजी' हे नाव ठेवण्यात आलं आहे. दुस-या बाजीराव पेशव्यांनी गडदेवता शिवाई देवीला बहीण मानून भाऊबिजेला साडी-चोळी पाठविल्याचे उल्लेख देखील ऐतिहसिक दस्तावेजामध्ये आढळतात. Chhatrapati Shivaji Maharaj Quotes: शिवजयंती चं औचित्य साधत पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहचवा शिवरायांचे हे सकारात्मक विचार!
शिवनेरी किल्ल्यामध्ये शिवाई देवीची कोरीव स्वयंभू मूर्ती आहे. 1947 साली कुसूर या गावातील काही गावकर्यांनी देवीची मूर्ती तयार करून वसवली आहे. यादेवीचे चतुर्भुज सिहंवाहन, हातामध्ये गदा, तलवार, आयुधे असून दोन बाजूला महिषासुराच्या मूर्ती आहेत. देवीच्या मूर्तीची उंची सुमारे 3.15 फूट असून मूर्तीच्या चेहर्यावरील तेज प्र्सन्न करणारे आहे. दरम्यान आज शिवजयंती निमित्ताने या मूर्तीची पहाटे आरती करण्यात आली त्यानंतर शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली.