Shimga Festival 2025 Significance (फोटो सौजन्य - Edited Image)

Shimga Festival 2025 Significance: सनातन धर्मात होळी (Holi 2025) च्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. होळीचा सण हिंदू संस्कृती आणि हिंदूंच्या सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. महाराष्ट्रात हा सण 'शिमगा' (Shimga 2025) या नावाने साजरा केला जातो. दरवर्षी होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेच्या प्रदोष काळात केले जाते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात रंगांची होळी खेळली जाते. आज सर्वत्र होळीचा म्हणजेचं शिमग्याचा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे. विशेषत: कोकणात हा सण मोठा थाटामाटात साजरा केला जातो.

शिमगा सणाचे महत्त्व - (Shimga Festival Significance)

वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी आणि भरपूर पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोकणातील लोक शिमगा सण साजरा करतात. शिमगा सणाचे महत्त्व पौराणिक कथांमध्ये खोलवर रुजलेले आहे, विशेषतः होलिका दहनची आख्यायिका, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. शिमगा उत्सव हा महाराष्ट्रातील कोकण भागात साजरा केला जाणारा एक उत्सव आहे. हा होळीसारखाच एक सण आहे. याला शिमगा असेही म्हणतात. हा उत्सव सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध उत्सव आहे. (हेही वाचा - Shimga 2025 Wishes: शिमग्यानिमित्त खास Messages, Wallpapers, WhatsApp Status, Images पाठवून द्या होळीच्या सणाच्या शुभेच्छा)

शिमगा साजरा करण्याची परंपरा प्रदेशानुसार वेगवेगळी -

कोकणातील लोक फाल्गुन पौर्णिमेपासून पाच दिवस शिमगा साजरा करतात. हा उत्सव राज्यातील किनारी जिल्ह्यांमध्ये साजरा केला जाणारा सर्वात उत्साही आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध उत्सवांपैकी एक आहे. प्रत्येक प्रदेशात हा सण साजरा करण्याची स्वतःची परंपरा आहे, जी देशाच्या विविधतेचे प्रतिबिंब आहे.

दरम्यान, कोकणात शिमगा उत्सवात पालख्या काढल्या जातात. शिमग्याचा उत्सव रत्नागिरीतील मिरजोल कालिका माता मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय, गोव्यात शिग्मो हा उत्सव साजरा केला जातो. हा गोव्यातील एक लोकप्रिय सण आहे. शिगमोत्सव हा होळीच्या सणासारखाच असतो.

शिमगा पूजाविधी -

शिमग्याच्या दिवशी कोकणातील लोक ग्राम दैवतेला पुरणाच्या पोळीचा नैवैद्य दाखवतात. तसेच एकत्र येऊन होळीभोवती पारंपारिक लोकनृत्य सादर करतात. याशिवाय, गोव्यात शिमग्याच्या दिवशी लोक घोडे मोडिनी (घोडेस्वार योद्ध्यांचे नृत्य), गोफा आणि फुगडी यांसारखे पारंपारिक लोकनृत्य करतात.