
Sanskrit Day Marathi Wishes: दरवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस रविवार, 22 ऑगस्ट दिवशी साजरा होणार आहे. जागतिक संस्कृत दिवस हा विश्वसंस्कृतदिनम् म्हणून ओळखला जातो. संस्कृत ही भारताची सर्वात प्राचीन भाषा असून या भाषेचे जतन करण्यासाठी संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत भाषेत सुमारे 102 अरब 78 कोटी 50 लाख शब्दांचा सर्वात मोठा शब्दसंग्रह आहे. संस्कृत भाषा उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली. या दिनानिमित्त मराठी Wishes, Messages, Greetings आणि Quotes सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन द्या शुभेच्छा.
1969 साली सर्वप्रथम संस्कृत दिवस साजरा करण्यात आला. प्राचीन भाषेच्या संर्वधन, जतन करणे हा यामागील हेतू होता. यातून भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडते. भारतीय शास्त्रातील अनेक मंत्र, श्लोक, पुजाविधी संस्कृत भाषेत आहेत. सुमारे 3500 वर्षांपूर्वी या भाषेचा उगम झाला, असे मानले जाते.
संस्कृत दिनाच्या शुभेच्छा!





संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी असून त्यापासून इतर भाषांचा उगम झाला आहे. इतकी प्राचीन भाषा असूनही ती कम्प्युटर फ्रेंडली आहे. तसंच ही भाषा शिकल्याने, बोलल्याने उच्चार स्पष्ट होण्यास मदत होेत. या भाषेचे ज्ञान असलेल्यांना याच्या गोडीचा अनुभव घेता येईल.