Sankashti Chaturthi Moon Rise Timings: यंदा सप्टेंबर महिना हा गणेशभक्तांसाठी खास आहे. या महिन्याच्या सुरूवातीला गणपती बाप्पाचं घरात आगमन करून त्याची दहा दिवस सेवा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच जड अंतकरणाने त्याला निरोपही देण्यात आला आणि आता पुन्हा बाप्पाच्या सेवेसाठी आज संकष्ट चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) दिवस आला आहे. दर महिन्यामध्ये कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. अनेक गणेशभक्त या दिवसाचं औचित्य साधत संकष्टी चतुर्थी निमित्त दिवसभराचं व्रत करतात. रात्री चंद्रोदयानंतर या व्रताची सांगता करण्याची रीत आहे. मग आज तुम्ही देखील रात्री चंद्रोदयानंतर बाप्पाचं हे व्रत पूर्ण करणार असाल तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मधील चंद्रोदयाच्या नेमक्या आज वेळा काय आहेत?
विविध भागात चंद्रोदयाची वेळ ही वेगवेगळी असते मग पहा मुंबई, पुणे सह राज्यात आणि राज्याच्या बाहेर देखील असलेल्या गणेशभक्तांंसाठी असलेल्या विविध प्रांतातील आजच्या चंद्रोदयाची वेळ काय आहे? Sankashti Chaturthi Special Rangoli: संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाचं रूप रांंगोळीतून साकारून दिवसाची करा मंगलमय सुरूवात!
जाणून घ्या आजच्या चंद्रोदयाच्या वेळा काय?
मुंबई 21:23
ठाणे 21:22
इंदौर 21:07
पुणे 21:19
रत्नागिरी 21:23
बेळगाव 21:19
कोल्हापूर 21:20
सातारा 21:19
नाशिक 21:18
सावंतवाडी 21:22
पणजी 21:22
नागपूर 20:55
चंद्रपूर 20:55
दरम्यान संकष्टी चतुर्थीचं व्रत हे दु:ख, संकटांचा नाश करून आयुष्यात प्रगती आणि मनोकामना पूर्ण करण्याच्या उद्देशाने केले जाते. संकष्टी चतुर्थीचं व्रत स्त्री, पुरूष दोघेही करू शकतात. दिवसभराच्या उपवासानंतर रात्री चंद्राला आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये जेवणासोबतचा बाप्पाच्या आवडीचे मोदक देखील असतात. तळणीचे किंवा उकडीचे मोदक हे राज्यात विविध प्रांतातील खाद्यसंस्कृतीनुसार बनवले जातात. बाप्पाला या दिवशी लाल जास्वंड, दूर्वा अर्पण करण्याची रीत आहे.