Ganpati | Representational image (Photo Credits: pixabay)

जुलै महिन्यामध्ये 24 जुलैला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. गणेशभक्तांसाठी दर महिन्यात येणारा हा चतुर्थीचा दिवस खास असतो. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी अनेकजण मनातील इच्छा पूर्ण होवोत या अपेक्षेने गणपती बाप्पाचं व्रत केले जाते. या व्रताची सांगता चंद्रोदयानंतर होत असल्याने अनेकांसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय वेळ खास असते. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणरायाची विधिवत पूजा केली जाते. बाप्पाला दूर्वा, फूलं अर्पण केली जातात. नैवेद्याला उकडीचे मोदक बनवले जातात. गणेश मंदिरामध्ये जाऊन देखील अनेक भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. नियमित संकष्टीचा उपवास करणारी मंडळी बाप्पाची घरी देखील या दिवशी साग्रसंगीत पूजा करतात. उपवासाच्या जेवणात कांदा-लसूण विरहित जेवणाचा समावेश करतात. संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा Facebook Messages, Images द्वारा शेअर करत खास करा आजचा दिवस!

पहा 24 जुलै दिवशी  चंद्रोदयाची वेळ

मुंबई  21.48

पुणे  21. 44

नाशिक 21.45

नागपूर 21.23

रत्नागिरी 21.45

गोवा 21.42

बेळगाव 21.40

चंद्र उगवल्यावर चंद्राला अर्घ्य अर्पण करून गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर गणपती स्त्रोत्र पठण केले जाते शेवटी लोकांना प्रसाद वाटप करून उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान गणेश  प्रसन्न होतात. त्यांना शमीची पाने अर्पण केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते. असाही समज आहे. जर तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 17 वेळा श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. तुमची समस्या दूर होईल. असं म्हटलं जातं.

टीप  - सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहलं आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.