Sankashti Chaturthi 2024: गणेश चतुर्थीला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. यंदाची आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे गणेश चतुर्थी बुधवारी 24 जुलै रोजी आहे. चातुर्मासातील ही पहिली चतुर्थी गजानन संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाला समर्पित असतो. या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. आपल्या जीवनात सुरु असलेल्या संकटांवर मात करण्यासाठी गणेशाची उपासना केली जाते. ज्या भक्तावर श्री गणेशाची कृपा असते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात तसेच त्या भाविकाच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात. शिव-पार्वतीचा पुत्र भगवान गजानन यांना कोणत्याही प्रकारच्या विधी दरम्यान, श्रीगणेशाची प्रथम पूजा जावी असा वरदान आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक गणपतीची पूजा करतात. असे मानले जाते की, उपवास आणि उपासनेने, श्रीगणेशाच्या आशीर्वादाने, सुख, शांती आणि समृद्धीसह त्याची संततीची इच्छा देखील पूर्ण होते. दरम्यान, या खास प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, आज तुम्ही खाली दिलेले संदेश पाठवून आजचा दिवस आणखी खास करू शकता.
संकष्टी चतुर्थीला पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश